~ बारक्या काटक्यांवर चालणारी निर्धूर चूल ~
महागडया स्वयंपाक ईंधन-खर्चापासून कायमची सुटका!
“पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5)” एक अशी क्रांतिकारी निर्मिति आहे जी ग्रामीण भारतात घरगुती स्वयंपाकक्रियेला सुखकर, धूर- रहित व निर्धोक बनवून महागड्या ईंधन खर्चापासून जवळजवळ मुक्तच करते.
पी.आर.एस.-v5 एक निर्धूर आणि अतिकार्यक्षम चूल आहे जी एका ५ जणांच्या कुटुंबाचा संपूर्ण स्वयंपाक केवळ मुठभर बारक्या काटक्या वापरून बनवू शकते !
जर का लोक या चूलीचा वापर देशभरात मोठया संख्येने करू लागले तर ग्रामीण भारतात स्वयंपाक करणे सुलभ, स्वच्छ, सुरक्षित आणि अतिस्वस्त होईल, जळाऊ लाकडांची नाहक नासाडी मोठ्या प्रमाणावर थांबेल आणि देशात सर्वत्र चाललेली अंधाधुंद जंगलतोड आणि वृक्षसंहाराला आळा घालणे शक्य होईल.