Performance-marathi चुलीची क्षमता आणि स्वयंपाक-सामर्थ्य फक्त ६-८ बारक्या काटक्या वापरून १०-१५ मिनिटांत चूल २० कप चहा बनवते. (अंदाजे १५० ग्रॅम लाकडाचा वापर ) फक्त ८-१० बारक्या काटक्यांवर २०-२५ मिनिटांत १ किलो मऊ भात शिजवते. (व्हिडीओ ) (अंदाजे २०० ग्रॅम लाकडाचा वापर) केवळ १०-१२ बारक्या काटक्यांमधे २०-२५ मिनिटांत ५ मोठे बटाटे उकडून शिजवते (अंदाजे २५० ग्रॅम लाकडाचा वापर)केवळ १०-१२ बारक्या काटक्यांमधे २५ -३० मिनिटांत १० चपात्या भाजता येतात. (व्हिडीओ )(अंदाजे ३०० ग्रॅम लाकडाचा वापर)५ जणांना पुरेल एवढी तूरडाळीची आमटी फक्त १२-१५ काटक्यांवर ३५-४० मिनिटांत बनवता येते. (अंदाजे ३०० ग्रॅम लाकडाचा वापर) (व्हिडीओ ) आंघोळीसाठी दीड बादली पाणी १४-१८ काटक्यांच्या तुकड्यांवर २०-२५ मिनिटांत गरम होते. (अंदाजे ३५० ग्रॅम लाकडाचा वापर) (व्हिडीओ ) औष्णिक कार्यक्षमता = २८ – ३६ % ;औष्णिक शक्ति : ०.२ ते १.३ kW ;सरासरी जळणाचा वापर = १० ग्रॅम प्रति मिनिट ; चुलीचे वजन = ५.५ किलो ; पुढे