अभिप्राय पाठवा / स्टोव्हची मागणी करा
पीआर.एस.-v5 स्टोव्हचे वितरणकरते : मेसर्स ” अॅप्लिनोवा “, २३०३ डॅफोडील टॉवर, मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४. भारत
स्टोव्ह मागवण्याकरिता, खालील फॉर्म भरून पाठवावा. आम्ही आपणास आपल्या मागणीनुसार किंम्मतपत्र लवकरात लवकर पाठवू .
सद्धया स्टोव्हची उपलब्धता सिमीत आहे , पण लवकरच स्टोव्ह बाजारात पुरवण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात निर्मिती चालू करीत आहोत.
तुर्तत: स्टोव्हचे वितरणात अशा ग्राहकांना आम्ही प्राधान्य देत आहोत ज्यांना आपल्या घरगुती स्वयंपाकासाठी ह्या स्टोव्हची खरोखरच गरज आहे व जे विकत घेतलेले स्टोव्ह लगेचच उपयोगात आणनार आहेत.
आपण फॉर्ममध्ये जी माहिती द्याल त्याच्या आधारे आम्हाला आपल्या मागणीचे वर्गीकरण करून तिचे प्राधान्य ठरवता येईल व त्याचबरोबर ह्या स्टोव्हच्या बाजारमागणीचा अंदाज बांधता येईल. तरी कृपया संपूर्ण व सत्य माहिती फॉर्ममध्ये पुरवावी.
ह्या स्टोव्हचे सामाजिक व पर्यावरण संबंधीचे महत्व लक्षात घेता आम्हाला हा स्टोव्ह लवकरात लवकर जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. अशा गरजू लोकांना अनुदानाद्वारे स्टोव्ह पुरवणाऱ्या दात्यांना उत्तेजनात्मक विशेष सवलतिच्या दरात स्टोव्ह मिळेल.
तरी आपण अशा अनुदानासाठी स्टोव्हची मागणी करत असाल तर तसे फॉर्म मध्ये अवश्य नमूद करा.
आपल्याला सवलतीचे दर व मागणीपूर्तीत प्राधान्य मिळेल.
.