Features-marathi
(पी.आर.एस.-v5) चुलीची क्रांतिकारी वैशिष्ट्ये
- केवळ काटक्यांवर चालणारी चूल – संपूर्ण स्वयंपाक फक्त मुठभर सुक्या काटक्यांत होतो !
( एका पूर्ण कुटुंबाचे अन्न शिजवायला केवळ झाडांच्या पडलेल्या बारीक काटक्यांचे तुकडे पुरेसे पडतात! ही चूल जळण म्हणून विविध जैवभार (बायोमास) म्हणजेच, शेणाच्या गोवऱ्या, उसाची चिपाडेे, कृषि-कचरा वगैरेचा वापर करू शकते परंतु हिचे आदर्श ईंधन म्हणजे आपल्या गावांमध्ये सर्वत्र विखुरलेले बारीक काटक्यांचे लहान लहान तुकडे जे आपल्या देशातील ग्रामस्थांना सदैव निःशुल्क उपलब्ध असतात. आता झाडांच्या मोठ्या जाड फांद्या तोडायची अजिबात गरज नाही. फक्त घराच्या जवळपास एक फेरफटका मारून हाताच्या मुठीत मावतील इतक्या बारीक काटक्या जमा करून आणा. त्यांवर आपले दिवसभराचे अन्न शिजेल ! पी.आर.एस.-v5 स्टोव्ह ग्रामवासियांना देतो महाग ईंधनखर्चापासून कायमची मुक्ती !! ) - जळणाचा वापर सध्याच्या वापराच्या केवळ २०-२५ %
( जळण ईंधनाच्या वापरात निर्णायक, विलक्षण व अभूतपूर्व बचत ! पी.आर.एस.-v5 चूलीवर सहा जणांसाठी पूर्ण भोजन १ किलोहून कमी काटक्यांवर तयार करता येते. साधारणतः एक ग्रामीण कुटुंब आपल्या पारंपरिक चुलीत जे लाकूड ईंधन २ ते ३ महिन्यांत जाळून टाकते तेच ईंधन “पी.आर.एस.-v5” चूल वापरल्यास त्या कुटुंबाला वर्षभर पुरू शकते ! ) - निर्धूर व निर्धोक स्वयंपाक – आरोग्याची सुरक्षा
( पी.आर.एस.-v5 चुलीत योग्य प्रमाणात ईंधन वापरले तर अजिबात धूर होत नाही व स्वयंपाकाकारणे होणारे घातक गृहप्रदूषण आणि स्वास्थ्यहानी टळते. आग व ज्वाळा पूर्णपणे आतल्या आत आवृत्त असल्याने ही चूल वापरताना आगीचा धोका अजिबात नाही.) - वापरायला सोपी
( पी.आर.एस.v-5 चूल घासलेट किंवा अन्य पेट्रो-ईंधनाशिवाय सहज प्रज्वलित होते. केवळ थोड़ा कागद, सुकलेले गवत अथवा पाला-पाचोळा वापरून चूल पटकन पेटवता येते. * फुंकणीची आवश्यकता नाही. ही चूल स्वयं-उत्पादित वायु शोषणावर काम करते. * चुलीत जमलेली राख, चूल न विझवता, बाहेर पाडता येत असल्याने ही चूल कितीही वेळ सतत चालवता येते. * चूल आकाराने चिंचोळी व वज़नाने हलकी असल्याने सहजपणे कुठेही घेऊन जाता येते, अगदी सहलीला देखील! ) - किफायती आणि टिकाऊ
( “पी.आर.एस.-v5” चुलीमुळे जळण खर्चात प्रचंड बचत होते. * या बचतीद्वारे, वापर सुरु केल्याच्या ६ ते ८ महिन्यांतच ही चूल स्वत:च्या खरेदीमूल्याची परतफेड करते. * चूल ५ ते ६ जणांच्या कुटुंबासाठी आदर्श आकार व क्षमतेची आहे. * मजबूत रचना व बांधणी * ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या भांड्यांना स्थिरपणे पेलण्याची क्षमता. * गंजमुक्त दीर्घकालीन वापरासाठी उच्च दर्जाच्या पावडर कोटेड स्टील पासून बनलेली. )