Product-marathi
प्रत्यक्ष वस्तू
पानवाल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस.-v5) हि मागील पृष्ठावर वर्णित बोध्कल्पनेच्या तत्वांना प्रत्यक्षात आणनारी मूर्तीरूप वस्तू आहे.
पी.आर.एस.-v5 चूल एक अभिनव (पेटंट-पेंडिंग) आविष्कृती आहे जीची कार्यरचना डॉ.विनिआरस्की यांनी मांडलेल्या “रॉकेट स्टोव्ह” संकल्पनेच्या अभियांत्रिकी मूल तत्वांशी निगडीत आहे.
“रॉकेट स्टोव्ह” ह्या संकल्पनेवर आधारित घरगुती स्वयंपाकासाठी निर्मित केलेली भारतातली हि पहिलीच चूल आहे.
चुलीच्या कार्यरचनेचे मुख्य पैलू व वैशिष्ट्ये खाली चित्ररूपी नमूद केली आहेत :-
पेटवायला अगदी सोपी :![]()
पी.आर.एस.-v5 चूल पेटवायला अगदी सोपी आहे. 
सुरुवातीला थोडा कागद अथवा वाळलेलं गावत, जे पटकन पेटते, ते आत टाकून त्यावर अगदी पातळ काटक्या ठेवाव्यात.
मग फक्त चुलीच्या खाली, चित्रात दर्शविल्या प्रमाणे, लाईटर धरायचा कि झालं! चूल काहि क्षणातच धगधगीत पेटू लागते !
नंतर लगेच थोड्या जाडसर काटक्या टाकून चूल पेटती ठेवायची .

चुलिच्या भिंतींमध्ये राख भरून स्टोव्ह वापरला जातो. राखेच्या ह्या आवरणाने स्टोव्हच्या अग्निकुंडात उष्णता वाढते व त्याच बरोबर बाहेरून भिंतींचे तापमान मर्यादित राहते. ह्यामुळे पटकन चटका बसण्याचा धोका राहत नाही. अग्निकुंडातील वाढीव तापमानामुळे एकट्या दुकट्या काटक्या देखील न विझता स्थिरपणे जळत राहू शकतात. पहिल्या उकळी नंतर जर मंद विस्तवावर अन्न सावकाश शिजवले तर अन्नाची पोषणशक्ती व चव दोन्हीत वृद्धी होते. एकट्या दुकट्या काटकीच्या मंद विस्तवावर अन्न शिजवता येणे हे पी.आर.एस.-v5 चुलीचे अद्वितीय वैशिष्ट्य होय ! ह्या मुळेच ही चूल दुर्बल वाटणाऱ्या काटक्यांना घरगुती स्वयंपाकासाठी परिपूर्ण इंधनाचा दर्जा मिळवून देते व देशातील गावोगावी भासणारे इंधन दुर्भिक्ष कायमचे समाप्त करण्याचे आश्वासन देऊ शकते.

चूलीच्या रचनेतील एक अभिनव (पेटंट-प्रलंबित) आविष्कार म्हणजे आकार बदलु शकणारा भांडे-घेरा.
चित्रात दर्शविल्या प्रमाणे हा पत्र्याचा भांडे-घेरा भांडयाच्या भोवती, थोडीशी फट ठेवून, गुंडाळलेला असतो. ह्या भांडे-घेऱ्यामुळे चुलीच्या मुखातून निघणाऱ्या ज्वाळा बाजूने बाहेर न पसरता, भांडे व भांडे-घेरा ह्यांतील फटीतून थेट वर येतात व भांड्याच्या केवळ तळालाच नव्हे तर भांड्याच्या बाजूंना हि स्पर्श करून तापवतात.
भांडे-घेरा असा आहे कि त्याचा व्यास सहज व सततरीत्या बदलता येतो व त्याचा वापर कोणत्याही आकाराच्या भांडयाबरोबर करता येतो.
भांडे-घेरा व्यवस्थित वापरल्यास स्वयंपाकाला लागणाऱ्या इंधनात कमालीची कपात होते. पी.आर.एस.-v5 चुलीची उच्च औष्णिक कार्यक्षमता अधिक करून ह्या भांडे-घेऱ्यामुळेच प्राप्त होते.
विश्वास बसणार नाही, पण खरं पाहिलत तर भांडे-घेरा वाली पी.आर.एस.-v5 चूल आधुनिक स्वयंपाकगृहातील पी.एन.जी.गॅस चुलीपेक्षा लवकर अन्न शिजवू शकते !

पी.आर.एस.-v5 चुलीचे इंधन-मुख तिरके व ऊर्ध्वगामी असल्यामुळे चुलीतला अग्नि स्वयंपाक करायला बसलेल्या व्यक्तीला सहज व सतत दिसत असतो. त्या कारणे हि व्यक्ती अग्नीवर अगदी व्यवस्थित नियंत्रण ठेवू शकते.
विस्तव सतत नजरेसमोर असल्यामुळे आगीत इंधन योग्य वेळीच व योग्य प्रमाणातच टाकणे सोपे जाते व त्यामुळे इंधन बचत व निर्धूर स्वयंपाक अशा दोन्ही गोष्टी सफल होतात.
चूल न विझवता राख-निखाऱ्यांचे निस्सारण :
ह्या चुलीची घडण अशी केली आहे कि चूल न विझवता अथवा स्वयंपाक न थांबवता चुलीत साठलेली राख व निखारे बाहेर टाकता येतात.
हे करण्या करीता चित्रात दाखविल्या प्रमाणे जळत असलेल्या ताज्या इंधन काटक्या एका हातांनी धरून ठेवून दुसऱ्या हाताने चुलीची इंधन-आधार-जाळी बाहेर ओढून थोडी हलवावी. राख खाली पडल्यावर जाळी व काटक्या सोडून द्याव्यात. मोकळ्या अग्निकुंडात काटक्या पुन्हा प्रखरतेने पेटू लागतील.
अशा प्रकारे चूल आपण सतत हवा तेवढा वेळ चालवू शकता.

पी.आर.एस.v5 चूल गंजरोधक पावडर कोटेड स्टील धातु पासून बनलेली आहे.
चुलिचे अग्निकुंड हे दीर्घ वापराअंती खराब झाल्यास नवीन कुंडाने बदलता येते. नवीन कुंडाचे भाग पूर्ण चुलीच्या औंषमात्र किमतीत विकत घेता येतात. अग्नीकुंड बदलून जुनी चूल पुन्हा नवीन चुली सारखीच होते.
चुलीची घडण अतिशय घटमूट असून, विस्तारीत पऊलांमुळे ही चूल ५० किलोहून जास्त वजनाची मोठी भांडी तोल न जाता, स्थिरतेने सहज पेलू शकते.

सुटसुटीत, विघटनशील व सहलचूल म्हणून उत्तम:
चुलीच्या विभक्त भागांची जोड़नी व विघटन नट-बोल्ट द्वारे अगदी चटकन करता येते.
चुलिचे सर्व विभक्त भाग चुलीच्याच पोटात मावतात. त्यामुळे चूल एका सुटसुटीत चौकोनी डब्यात मावते जो सहलीला जाताना आपल्या बरोबर सहज घेऊन जाता येतो.


