• हिन्दी
  • English
घरगुती चुलीचा एक अभिनव आविष्कार

The Need – marathi

सरपण वाहण्याचे अमानुष कष्ट
बेलगाम जंगलतोड व पर्यावरणाचा ऱ्हास

देशाची तातडीची गरज

जनगणनेनुसार भारताची निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या घरात जळण वापरून स्वयंपाक करते !
फक्त ग्रामीण लोकसंख्येचा विचार केल्यास हे प्रमाण ७०% पर्यंत पोहचते !

असे असून सुद्धा, आपल्या देशाच्या खेडूताला गावच्या दुकानांमध्ये एखादी परवडणारी कार्यक्षम चूल पाहायला देखील मिळत नाही.  परिणामी बहुतांश ग्रामीण घरे आजही आपले स्वयंपाक अगदी अल्पविकसित अशा ३-दगडांच्या चुलींवर करतात जी एक अतिशय अक्षम व अपायकारक पद्धत आहे.

या ३-दगडी चुलींमुळे बहुमूल्य जळणाची मोठ्या प्रमाणात निष्कारण नासाडी होतेच होते, शिवाय या चुलींतून निघणाऱ्या आरोग्यास अत्यंत घातक अशा धुरामुळे आपल्या देशातील लाखों ग्रामवासी, विशेषकरून महिला व बालके, यांना फुफ्फुसांचे असाध्य रोग होऊन त्यांतील लक्षावधि जण मृत्युमुखीही पडतात.
एक अकार्यक्षम चूल ही पर्यावरणासाठी एक मोठी विनाशकारी वास्तु आहे आणि आज अशा लाखो चुली आपल्या ग्रामीण घरांतील अंतर्गत वातावरण व देशातील बाह्य पर्यावरण प्रदूषित करीत आहेत.


जागतिक आकडेवारीनुसार 
जगभरातील सुमारे ४० लक्ष लोक घरातील चूलनिर्मित धुरामुळे झालेल्या वायु प्रदूषणाने ओढवलेल्या आरोग्यविकारांनी मृत्युमुखी पडतात. यांतील बहुतांश स्त्रिया व मुले असून त्या ४० लाखांमधील ८ लाखांहून अधिक भारतीय असतात!
ही एक राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थितीच असून त्यावर तात्काळ तोडगा काढणे देशासाठी अत्यावश्यक आहे
भारत देशाला एक अशा स्वयंपाक चुलीची आवश्यकता आहे, जिच्यामुळे जळणाचा वापर अतिशय कमी होईल, स्वयंपाकघरातील धूर नाहीसा होईल व जी परवडणाऱ्या दरात देशभरात सर्वत्र उपलब्ध असेल.