• हिन्दी
  • English
घरगुती चुलीचा एक अभिनव आविष्कार

पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5) – प्रात्यक्षिक व्हिडिओ

पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5) - प्रात्यक्षिक व्हिडिओ

व्हिडिओ बघण्याकरिता चित्रांवर क्लिक करा.

साधा भात शिजवताना …


पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5) चुलीवर साधा भात अगदी पटकन शिजवता येतो !

फक्त २१० ग्रॅम काटक्या वापरून २० मिनिटात चार जणांना पुरेल इतका भात चूल शिजवताना ह्या विडीओ मध्ये पहायला मिळेल.

तूर डाळीची आमटी करताना …


LPG गॅस वर साधारण पणे जेवढा वेळ लागतो जवळ जवळ तेवढ्याच वेळात (पी.आर.एस-v5) चूल तूर डाळीची आमटी बनवू शकते !

३५० ग्रॅम काटक्यांचा वापर करून ४० मिनिटांत चूल ४ जणांसाठी पुरेल इतकी आमटी बनवताना पहा.

खिचडी आव्हान …


प्रेशर कूकर न वापरता केवळ ३३५ ग्रॅम काटक्यांमध्ये ५ ते ६ जणांना पुरेल इतकी खिचडी तयार करायचे आव्हान स्वीकारताना (पी.आर.एस-v5) चूलीला पहा.

केवळ ४२ मिनिटांत, म्हणजेच LPG गॅस किंवा इलेक्ट्रिक कूकर वर जितका वेळ लागेल जवळ जवळ तितक्याच वेळात खिचडी शिजवून तयार !

चपात्या भाजताना …


पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5) चुलीवर चपात्या पण छान पणे भाजून येताना पहा.

२० मिनिटांत ८ चपात्या केवळ २७५ ग्रॅम काटक्या जाळून तयार झाल्या !

तव्याचे तापमान ३०० औंश सेलसिअस पेक्षा जास्त होते. म्हणजे अगदी LPG स्टोव्ह वर ठेवलेल्या तव्याच्या तोडीचे!

हे प्रात्यक्षिक एका फ्लॅटच्या बंद खोलीत केलेले असूनही धुराचा जरा देखील त्रास जाणवला नाही !!

आंघोळीसाठी पाणी तापवताना … 


पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5) चूल आंघोळीसाठी पाणी तापवण्याचे अगदी उत्तम साधन आहे.

१५ ते १८ काटक्या ( ३५०-४०० ग्रॅम) वापरून २५ मिनिटांत ५ लीटर पाण्याला अगदी घशधशीत उकळी आणताना चुलीला पहा.

ह्या उकळत्या ५ लीटर पाण्यातून सहज दीड ते दोन बालदी स्नानासाठी गरम पाणी तयार होईल.

चूल पेटवताना … 


(पी.आर.एस-v5) चूल पेटवायला किती सोपी आहे ते पहा !

ना घासलेट, ना फुंकणीची गरज.

थोडा कागद बोळे करून आत ठेवा व त्यावर थोड्या पातळ काटक्या रचा.

नंतर स्टोव्ह खाली फक्त ज्वाला धरा. झालं, काही सेकंदातच चूल पेट घेते ! . 
 

भरीताचे वांगं भाजताना …


पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5) चुलीवर भारीताचे वांगे अगदी उत्तमरीत्या भाजता येते!

थेट लाकडाच्या आगीवर शेकलेल्या वांग्याची चव वेगळीच असते व त्याचे भरीत स्वादिष्ट होते! 

ह्या व्हिडीयो मध्ये वांगं भाजण्याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळेल.

सुसज्ज दिवाणखान्यात निर्धूरपणे संपूर्ण स्वयंपाक करताना … 


पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5) चूल हि इतकी निर्धूर आहे कि दोन चूली जरी एकत्र घराच्या दिवाणखाण्यात स्वयंपाकासाठी पेटवल्या तरीही त्याचा जरा देखील त्रास होत नाही!

चूल इतकी कार्यक्षम आहे कि ५ जणांचा संपूर्ण स्वयंपाक केवळ ७०० ते ८०० ग्रॅम काटक्यांवर तासाभराच्या आत होऊ शकतो!

ह्या व्हिडीयो मध्ये, दोन चूली एकत्र एका आधुनिक घरातील दिवाणखान्यात खिचडी, आमटी, भरीत व तोंडली-बटाट्याची भाजी, असा संपूर्ण स्वयंपाक करताना पहायाला मिळतील.   

जाड्या भाकऱ्या भाजताना … 


भारतीय पद्धतीचा स्वयंपाक करताना जाड्या भाकऱ्या भाजण्यासाठी सर्वात जास्त विस्तव लागतो.  

कडक तापलेला तवा व स्थिर सतत ज्वाळा मिळाल्या शिवाय भाकरी चांगली भाजून येत नाही.

ह्या व्हिडीयो मध्ये (पी.आर.एस-v5) चूल भाकरी भाजण्यात कशी यशस्वी होते ते पहा !

व्हिडीयोच्या सुरुवातीला चूल घासलेट अथवा फुंकणीविना कशी चटकन पेटवता येते ते देखील पाहायला मिळेल!

पापड भाजायला उत्तम …


पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5) चुलीवर पापड अगदी छान भाजता येतात !

थेट लाकडाच्या विस्तवावर शेकलेल्या पापडांची चव फार स्वादिष्ट असते हे सांगायलाच नको !

ह्या व्हिडीयो मध्ये कुरकुरीत पापड भाजण्याचे प्रात्यक्षिक पहा !

पानवल रॉकेट स्टोव्हची  बाजारात प्रसिद्ध असलेल्या एका निर्धूर चुलीशी तुलना … 


पानवल रॉकेट स्टोव्ह (पी.आर.एस-v5) चूल हि बाजारातील इतर सर्व निर्धूर चुलींपेक्षा पेटवायला  अधिक सोपी आहे .
दुसरी चूल पेटवायला जो वेळ लागतो त्याच्या अर्ध्याहून कमी वेळ लागतो हिला.
लाकूड पण अर्ध्याहून कमी लागते.

ह्या विडिओ मध्ये
पानवल रॉकेट स्टोव्हची तुलनात्मक कार्यक्षमता किती जास्त आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता !

नवीन स्टोव्हची  जोडणी  … 


नवीन चूल बॉक्स मधून काढून चुलीच्या विभक्त भागांची जोड़नी चटकन कशी करयची ते पहा.